(कसे अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या अग्रलेखाचे शीर्षक वाटतेय ना!)
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या पोलीस उपायुक्तांशी भेट झाली. ( तुरुंगात नव्हे,सदिच्छा भेट!) त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे चालली असताना एकीकडे टिपणे घेणेही सुरु होते. माझ्याशेजारी बसलेली अमेरिकन सहकारीही त्यांच्याशी संवाद साधत होती, परंतु नोट्स मत्र घेत नव्हती. तेथून बाहेर पडताना मला म्हणाली, "तुझ्या नोट्स नंतर मला दे." 'उपायुक्त इंग्लिशमध्ये बोलत असूनही हिने नोट्स का बरे घेतल्या नसतील?' नंतर मी दिलेल्या नोट्स तिने भराभर कॉम्प्युटरवर टाईप करून घेतल्या तेंव्हा मात्र मला हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवेना.
"Actully, मला लिहायला थोडे अवघड जाते. मी लिहायला 4th मध्ये असतानाच शिकले. पण मी चार वर्षांची असल्यापासून कॉम्पुटर वापरते. त्यामुळे मला सगळे लिखाण कॉम्पुटरवरच करणे सोयीचे आहे." -तिचे उत्तर. (Actullyला समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही.) माझ्या डोक्यात विचार सुरु झाला.
मी पहिल्यांदा पाचवीत असताना कॉम्प्युटर हाताळला आणि इतक्या वर्षांनी माझे कॉम्प्युटरचे ज्ञान पाहता मी सध्या सहावीत शिकत असल्याचा अनेकांचा समज होईल. आपल्या देशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या चार टक्क्यांमध्ये माझा समावेश होत असेल तर इतर ९६% मुलांचे काय?
मला वाटले, हा एक चांगल्या लेखाचा विषय आहे. मी त्यादृष्टीने अभ्यास सुरु केला. पुढील काही दिवसात अमेरिकेतील शिक्षणपद्धती,त्या पद्धतीमधील संगणकाचा वापर, त्यासंदर्भात आपली शिक्षणव्यवस्था, साक्षरता अभियान, आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये संगणकज्ञानाचा वापर यांविषयी माहिती जमविली.
भारतात २०१५ पर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्माण होतील. हे रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संगणकज्ञान व कौशल्य असलेल्यांची संख्या, मनुष्याचा कौशल्यास्तर(human skill index)वाढवण्यातील संगणकाची उपयुक्तता व गरज, काय काय गोष्टी पडताळल्या!
साक्षरता अभियानाचा संपूर्ण डोलारा हा अजूनही अपवाद वगळता खडू, फळा इत्यादी साधनांवर अवलंबून आहे आणि देशाच्या राष्ट्रीय ठोक उत्पन्नातील(GDP) सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा असून त्यामध्ये संगणकाशी संबंधित सेवा आघाडीवर आहेत. हे सर्व विचारात घेता 'देश साक्षर बनवण्याच्या प्रयत्नात आपण एक नवी निरक्षरता निर्माण करत आहोत', अशा निष्कर्षाप्रत आलो.
परवा कॉलेजच्या कॉम्पुटर रूममध्ये मराठी टायपिंगशी झगडत बसलो होतो. तेंव्हा पूर्ण शिक्षण महानगरात झालेली शेजारील मैत्रीण वेगाने इंग्रजी टायपिंग करताना म्हणाली, "मला हल्ली कागदावर लिहिताना काही सुचतच नाही. कॉम्पुटरवर टाईप करून नंतर कागदावर उतरवावे लागते!" (महाविद्यालयातील संगणककक्षात टंकलेखन वगैरे लिहिवेना.)
अरेरे! उगाचच अमेरिकेतून माहिती मिळवण्यासाठी एवढा धडपडलो! लेख लिहिण्याचा मनसुबाही त्याक्षणी बारगळला!
"Actually" साठी "खरं तर" हा प्रतिशब्द चालला असता कदाचित
ReplyDelete.... बाकी लिखाण उत्तम..... निरक्षरता आहे खरी........!!!!
पण तुझं लेखन छान होतं आहे..... लिहीत रहा.... शुभेच्च्छा......!!!!
धन्यवाद!
ReplyDeleteछान आहे. "महाविद्यालयातील संगणककक्षात टंकलेखन वगैरे लिहिवेना" हेसुद्धा छान.
ReplyDelete