Sunday, December 13, 2009

रेस्टोरंटमधील अनुभव.

नमस्कार! माझा ब्लॉग म्हटल्यावर त्यातील पहिली 'पोस्ट' ही हॉटेलसंबंधी असणार हे परीचीतांस सांगणे न लगे! तथापि हा अनुभव माझ्या खाद्यावेडाविषयी नाही, अन्य आहे.


एक बरेसे रेस्टोरंट. काचेचे दर ढकलून एक तरुण आपल्या पत्नी व अंदाजे ६-७ वर्षाच्या मुलीसह दाखल. कपड्यांवरून कनिष्ठ मध्यमवर्गीय. (केवळ कपड्यांवरून आर्थिक निष्कर्ष काढणे अयोग्य असले तरी इतर स्पष्टीकरणे पुढे आहेत.) माझ्या शेजारील टेबलावर स्थानापन्न. आनंदी वातावरण. तीन-चार पदार्थांची 'ऑर्डर'. नव्या नोकरीत काम चांगले असून पगार समाधानकारक असल्याविषयी संभाषण. बोलण्यात उत्साह. पत्नीसाठी वातावरण कदाचित अनोळखी असल्याने ती काहीशी बिचकलेली. मुलगी प्रत्येक गोष्ट न्याहाळण्यात मग्न, अप्रुपित.( हा शब्द शब्दकोशात न आढळल्यास क्षमस्व!)
इतक्यात अंदाजे १०ते१२ वर्षे वयाच्या मुलामुलींचा घोळका एका मध्यमवयीन स्त्रीसह रेस्टोरंटमध्ये. माझ्यासमोरील मोठ्या गोलाकार टेबलावर आसनस्थ. पोशाखावरून उच्चमध्यमवर्गीय.( यांच्यासंबंधीही इतर स्पष्टीकरणे पुढे आहेत.) यापैकी एका मुलाचा जन्मदिन आणि त्यानिमित्त ही 'पार्टी'! सोबत असलेली स्त्री ही त्या मुलाची आई. रीतसर ऑर्डर. आधी सलाड्स मग सूप्स याप्रमाणे. जल्लोषी वातावरण. चीत्कार, हास्यविनोद इत्यादी. आईकडून सर्वांची अस्थेवायिकपणे विचारपूस. तिला उत्तरे देऊन बहुतेक सर्व लेटेस्ट कॉम्पुटर गेम्स आणि रोडीजच्या चर्चेत दंग. (बहुतेक चर्चा इंग्रजीत.) काही वेळाने 'ऑर्डर' टेबलावर. खाण्यापूर्वी सर्व मुलांचे उत्सवमूर्तीसाठी अभिष्टचिंतन. 'हैप्पी बर्थडे' चा गजर. शुभेच्छांचा हसून स्वीकार. जवळपास सर्व रेस्टोरंटचे लक्ष त्यांच्याकडे. त्यापैकी काहींच्या नजरेत कौतुक!
एव्हाना शेजारच्या टेबलावरही ऑर्डर आलेली. पती-पत्नी खाण्यात दंग, मुलीची अचंबित नजर मात्र एकटक समोरच्या टेबलावर. काही वेळाने आईशी-
"आई मला तसले बूट पाहिजे."
आईचाही एक कटाक्ष त्या मुलांकडे. तिच्याही नजरेत थोडे आश्चर्य. अस्पष्ट होकार.
आईच्या होकारातील उदासीनता लक्षात आल्यामुळे मुलीची वडीलांकडे पुन्हा तीच मागणी.
"तुला घेतलेत नवीन बूट. आता जेव बघू." वडिलांचे उत्तर.
"पण माझे असे नाहीत. हे वेगळे आहेत."
आई-वडील दोघांकडूनही दुर्लक्ष. मुलीची कोंडी. नजर पुनःपुन्हा त्या टेबलाकडे.
(हात दाखवून)" आपण तसले जेवण का नाही जेवत?"
"असा हात नाही दाखवायचा. आपण मागवलेले जेवणही चंगले आहे." वडिलांकडून समजूत.
" मला हे नको. आपणही तसेच जेवण सांगूया."
"पण मग या जेवणाचे काय करायचे? हे कोण जेवेल?" वडिलांचा पुन्हा प्रयत्न.
(चिडचिड्या स्वरात)," राहूदे तसेच!" ( या सुचनेलाही 'त्या' टेबलावर snacks आल्यावर सूप तसेच ठेवल्याची पार्श्वभूमी.)
"असा हट्ट नाही करायचा." आईची सौम्य शब्दात दमदाटी.
मुलगीही इरेला, (रडक्या सुरात) "तुम्ही मला काहीच घेऊन देत नाही. वरून सारखे ओरडता."
आईची पुन्हा दमदाटी. मुलीचा स्वर वाढता. "मी हे नाहीच जेवणार. मला तसेच जेवण पाहिजे."
नाईलाजास्तव आईकडून मुस्कटदाबी. वडिलांचे सामोपचाराचे प्रयत्न निष्फळ. मुलीचे भोकांड.
आता सर्व रेस्टोरंटचे लक्ष शेजारील टेबलावर. आत्तापर्यंत एकमेकांच्या नवीन वस्तूंचे कौतुक करण्यात गुंग असलेल्या सर्व मुलांची नजर त्या दिशेने रोखलेली. जवळपास सर्वांच्या चेहऱ्या वर त्रासिक भाव.
आई-वडिलांची अवस्था अवघडलेली. मुलीचे रडणे सुरूच. अखेर वडिलांची हताश नजर आईकडे. ती तडक मुलीला घेऊन रेस्टोरंटबाहेर.वडीलांकडून वेटरला बोलवणे. पुढ्यातील अन्न pack करायला सांगून बिलाची मागणी. चेहेऱ्यावर अपराधी भाव. बील देऊन खालमानेने बाहेरची वाट. त्यांच्या हातात packing पाहून काही अस्फुट हास्यकारंजे.
समोरच्या टेबलावरील मुलांमध्ये आता याविषयी कुजबुज सुरु. उत्सवमूर्तीच्या आईचे सर्वांचं लक्ष इतरत्र वेधण्यासाठी प्रयत्न. काही क्षणात वातावरण पूर्ववत. उत्साव्मूर्तीचा चेहेरा मात्र पडलेला. इतरजण गप्पात, खाण्यात व्यस्त असल्याचे पाहून त्याची आईला टोचणी.
"Its so embarrassing mom. हे कुठे घेऊन आलीस? इथे कसली माणसे येतात! My all friends are going to tease me tomorrow. You know, this issue will spread like anything & become tomorrow's hot topic in the school." आईकडून समजावण्याचा यथाशक्ती प्रयत्न. पार्टी एन्जॉय करण्याचा सल्ला. पण मुलाकडून थंड प्रतिसाद. चेहेऱ्यावरील ओशाळल्याचे भाव कायम. आता आईही हतबल. तिच्याही चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट जाणवणारी.
आणि ह्या दोन टेबलांच्या काटकोनातील मध्याबिंदुवर बसलेला मी.

15 comments:

  1. Chhan ahe.
    Pudhil posts vachun "अप्रुपित" honyachee vat pahat rahu.
    KHUP SHUBHECHCHHA.

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक धन्यवाद. कृपया पुन्हा एकदा पोस्ट वाचाल का? शेवटच्या सुधारित ओळीसाठी.

    ReplyDelete
  3. चांगलं लिहिलय - खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
  4. khup chhaan... 'utsavmurti' shbd purnataha nava (mazyakarta)... dhanyavaad...tase bhrpur shbd navech... pn sagle kuthe lihit basu???!!!!

    ReplyDelete
  5. छान लिहिलंय. असे अजून अनुभव वाचायला आवडतील. त्यातून नवे मराठी शब्द कळतील, अशीही अपेक्षा.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. धन्यवाद सुगंधा. आपली प्रतिक्रिया प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  8. saapadla ekdacha.....ani avadlahi...:) ata yapudche velevar vaachta yetil...:)

    ReplyDelete
  9. Hi.samvayask bhetlaa ...mi blogvar kaahipan lihto..tujha blog paahilyaavar gambhir lihaav ase vaatu laglay.

    ReplyDelete
  10. Lad saheb ekdam mast

    ReplyDelete
  11. mitraho , pratikriyanbaddal dhanyawaad! parantu, aple nav kalale aste, tar adhik anand zala asta.

    ReplyDelete